जिल्ह्यात महाकाली_महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या महोत्सवात दरवर्षी हजारो भाविक भक्त सहभागी होतात. याच पार्श्वभूमीवर आणि चंद्रपूरचे आराध्य दैवत माता महाकाली यांच्या कृपेसाठी आयोजित करण्यात आलेल्या श्री माता महाकाली महोत्सवाचे निमंत्रण पत्र आज दि 9 सप्टेंबर ला 12 वाजता आ. जोरगेवार यांनी मुबंई येथे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी_फडणवीस साहेब यांना देऊन त्यांना सन्मानपूर्वक निमंत्रित केले आहे.यावेळी महाकाली महोत्सव समितीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.