पूर्णा शहरातील कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय वस्तीगृह पावसाच्या पाण्याने अक्षरशः जलमय झाले आहे. सर्वात गंभीर म्हणजे, वस्तीगृहातील पूर्ण स्वयंपाकघर पाण्याखाली गेले आहे. या परिस्थितीतही विद्यार्थिनींना त्याच ठिकाणाहून जेवण उचलून बाहेर नेताना पाहायला मिळत आहे. पाण्यात उभे राहून अन्न तयार करावे लागत असल्याने स्वच्छतेसह आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. वस्तीगृहात राहणाऱ्या मुलींना अत्यंत हालअपेष्टा सहन कराव्या लागत असल्याचा व्हिडिओ आज शनिवार 13 सप्टेंबर रोजी सोशल मीडियावर व्हायरल.