लातूर : द्वारकादास शामकुमार परिवाराच्या वतीने शनिवार, दि. १३ सप्टेंबर २०२५ रोजी सायंकाळी चार वाजता लातुरात शिक्षक दिनाचे औचित्य साधून गुरुजनांचा सन्मान सोहळा तसेच ख्यातनाम व्याख्याते व प्रबोधनकार प्रा. गणेश शिंदे यांचे निरूपण आणि त्यांच्या सुविद्य पत्नी तथा महाराष्ट्राची महागायिका पुरस्कार प्राप्त गायिका सौ. सन्मिता धापटे - शिंदे यांचा गायनाचा एक वैचारिक, भक्तिमय अध्यात्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती द्वारकादास शामकुमारचे संचालक तुकाराम पाटील यांनी दिली.