पुण्यातील गणेशोत्सव आणि विसर्जन मिरवणुका प्रारंभापासून समारोपापर्यंत चर्चेचा विषय ठरल्या. मात्र, याच पुण्यात मानाचा समजल्या जाणाऱ्या कर्वे रोड विसर्जन मिरवणुकीत प्रशासनाला मोठा दिलासा मिळाला. कोथरूड भागातील सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी स्थापन केलेल्या कोथरूड गणेश विसर्जन नियोजन समितीच्या सतराव्या वर्षीच्या अथक प्रयत्नांमुळे, कर्वे रोडवरील विसर्जन मिरवणूक नियमित वेळेत, शिस्तबद्ध आणि हर्षोल्हासात पार पडली.