रावेर तालुक्यात वाघोदा बुद्रुक हे गाव आहे. या गावाच्या जवळ राजदीप पेट्रोल पंप आहे. या पेट्रोल पंपाच्या अलीकडे दुचाकी क्रमांक एम. एच.१९ ई.डी.३९५६ द्वारे विकास शशिकांत धांडे वय २८ हा तरुण जात होता त्याला बुलेरो पिकअप वाहन क्रमांक एम.एच.०४ के. यु.८२५७ वरील चालक पंकजा धनगर यांनी धडक दिली. या अपघातात विकास धांडे हा तरुण ठार झाला. तेव्हा या प्रकरणी सावदा पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.