दारव्हा पोलिसांनी मंगळवार दिनांक 19 ऑगस्ट रोजी वसीम अली मोहम्मद सोळंकी वय 35 वर्ष, रा. मेन लाईन आठवडी बाजार दारव्हा यांच्या आठवडी बाजारात जवळ असलेल्या कन्फेशनरीमध्ये शासनाने प्रतिबंधित केलेल्या गुटख्यावर पंच समक्ष धाड टाकली असता त्यांच्या दुकानांमध्ये 19,690 रुपयाचा (विमल, नजर, राजनिवास गुटखा) मुद्देमाल नमूद इसमासह ताब्यात घेऊन त्याबाबतची माहिती अन्न व औषध प्रशासनाचे अन्न सुरक्षा अधिकारी यांना संपर्क करून देण्यात आली