धुळे शहरातील मुंबई-आग्रा महामार्गावरील चाळीसगाव चौफुली परिसरात 23 ऑगस्ट रोजी दुपारी दोनच्या सुमारास आयशर ट्रकच्या धडकेत जब्बार युसुफ पठाण (रा. अंबिका नगर, धुळे) यांचा मृत्यू झाला. अपघातानंतर ट्रकचालक वाहनासह पसार झाला. पठाण हे रस्त्याच्या कडेला पायी जात असताना मागून आलेल्या भरधाव ट्रकने त्यांना जोरदार धडक दिली. याप्रकरणी जुबेर इकबाल पठाण यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चालकाविरुद्ध गुन्हा दाखल असून, पोलिस तपास सुरू आहे.