उचगाव येथे गणेश विसर्जन मिरवणुकीत ध्वनी प्रदूषण कायद्याचं उल्लंघन केल्याप्रकरणी 18 जणांच्या विरोधात गांधीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची फिर्याद सतीश दिलीप माने यांनी गांधीनगर पोलिस ठाण्यात दिली आहे. दोन सप्टेंबर रोजी सायंकाळी सहा ते रात्री बारा या वेळेत उचगाव इथं गणेश विसर्जन मिरवणुकीत कर्ण कर्कश्य डॉल्बी वाजवून मानवी जीवित आरोग्यास धोका पोहोचेल असं कृत केल्याप्रकरणी 18 जणांच्या विरोधात गांधीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.