बागलाण तालुक्यात धुमाकूळ घालणारा बिबट्या अखेर डांगसौंदाने येथे जेरबंद Anc: बागलाण तालुक्यातील डांगसौंदाणे येथील शेतकरी तुकाराम अंबर बागुल यांच्या शेतात वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात एक बिबट्या आज दिनांक 7 सप्टेंबर 2025 रोजी पहाटे 5 वाजेच्या सुमारास अडकला. गेल्या काही दिवसांपासून परिसरात बिबट्याचा मुक्त संचार सुरू असल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. तुकाराम बागुल यांच्या कोंबड्या व कुत्र्यांवर बिबट्याने हल्ला केल्यानंतर त्यांनी पिंजरा लावण्याची मागणी केली.