राजुरा शहरापासून अवघ्या 5 किमी अंतरावर झालेल्या ट्रक ऑटो अपघातातील 6 निष्पाप नागरिकांच्या दुर्दैवी मृत्यूच्या बातमीची शाई वाळण्यापूर्वीच 40 वर्षीय युवक वर्धा नदीत वाहुन गेल्याची घटना काल रात्री 8 वाजता घडली आहे. कोठारी येथिल रहिवासी अजय गिरटकर (40) हा युवक काही कामानिमित्य राजुरा येथे आला होता मात्र दि.30 ऑगस्टला वैयक्तिक कामाकरीता 8 वाजताच्या सुमारास कोठारी येथुन राजुरा कडे येत असताना सदर युवकाची दुचाकी वर्धा नदीच्या पुलावर असलेल्या चिखलामुळे घसरली व तो वाहून गेला.