पंचायत समिती मोहोळ येथे गुरुवारी दुपारी 3 वाजता शिरापूर येथील गुणाबाई मदने या महिलेनं घरकुल बांधण्यासाठी जागा नसल्यामुळे आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी सांगितले की, घरकुलाच्या जागेअभावी आत्मदहन करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, गटविकास अधिकाऱ्यांनी तातडीने हस्तक्षेप करून त्याच ठिकाणी घरकुल देण्याचे तोंडी आश्वासन दिले. तसेच पोलीस प्रशासनाने योग्य वेळी मदत करून परिस्थिती नियंत्रणात आणली.