नवी मुंबईच्या बेलापूर खाडीमध्ये यापूर्वी देखील अनेक वेळा गाड्या पडल्याच्या घटना घडल्या होत्या. त्यामध्येच एक दुसरी घटना समोर आली आहे. बेलापूर खाडीमध्ये दुचाकीसह दुचाकी वरील दोन जण बुडाले. माहिती मिळताच रेस्क्यू टीम घटनास्थळी दाखल झाले आणि दोघांपैकी एकाला बाहेर काढण्यात यश आले आहे, तर एकाला रेस्क्यू करण्यात साठी टीम शर्तीने प्रयत्न करत आहे. गेल्या तीन ते चार तासापासून दुचाकी वरील दुसऱ्या खाडीत बुडालेला व्यक्तीला रेस्क्यू करण्याचे काम सुरू असल्याची माहिती मिळत आहे.