कोल्हापूर शहर व उपनगरामध्ये मॉर्निंग वॉक करता जाणाऱ्या महिलांना चाकूचा धाख दाखवून जबरदस्तीने सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या टोळीला अटक करून त्यांच्याकडून 35 ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या दागिन्यासह 4 लाख 60 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला असल्याची माहिती कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी आज पोलीस अधीक्षक कार्यालयातून प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.