गेल्या तीन वर्षापासून या गावांमध्ये बस स्थानक नसल्याने पाण्या पावसामुळे त्या ठिकाणाहून प्रवास करणाऱ्या विद्यार्थी ,नागरिक, महिला ,पुरुष व वृद्ध यांना मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे .जुने बस स्थानक काढले मात्र नवीन बस स्थानक का बनवले नाही. हा विषय घेऊन अंजनसिंगी येथील नागरिक शासकीय बांधकाम विभाग धामणगाव रेल्वे कार्यालय येथे अधिकाऱ्यांची कडे धडकले. क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष कपिल पडघान यांनी याबाबत सविस्तर माहिती दिली.