आडगाव येथून जवळच असलेल्या श्री क्षेत्र मनुदेवी येथे गुरुपौर्णिमा उत्सव साजरा करण्यात आला. यानिमित्ताने मंदिरावर दुग्धाभिषेक कार्यक्रम घेण्यात आला होता सकाळपासूनच भावीक, भक्तांची मंदिरात दर्शनासाठी गर्दी झाली होती. मंदिर संस्थांचे अध्यक्ष शांताराम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण धार्मिक कार्यक्रम या ठिकाणी पार पडला.