अंजनगाव सुर्जी तालुक्यातील दहीगाव रेचा येथील कडुनाल्यात आज दि.१ ऑगस्ट सोमवार रोजी सायं ६ वाजता डोहात एका युवकाचा मृतदेह तरंगताना आढळून आला.दहीगांव येथील संत्रा तोडीस मजुर आले असता तोड झाले नंतर मृत युवक व त्याचे दोन सोबती शौचास गेले.शौचविधी नंतर तिघेही वाहत असलेल्या कडुनाल्यात हातपाय धुण्याकरिता गेले असता मो.रिजवान या युवकाचा शेवाळलेल्या दगडांवरुन पाय घसरला, आणि तो डोहात जावून पडला,मित्रांनी त्यास वाचविण्याचा प्रयत्न केला मात्र ते त्याला वाचवू शकले नाही.