कवठेमहांकाळ शहरात काल रविवारी दुपारच्या सुमारास फिल्मी स्टाईलने पाठलाग करून चाकूने वार केल्याचा गंभीर प्रकार घडलेला असून, चाकूने वार केल्याने अजय दत्तात्रय कांबळे सध्या राहणार माळीवाडी, कवठेमहांकाळ मूळ राहणार लंगरपेठ, (ता. कवठेमहांकाळ) असे जखमीचे नाव आहे. याप्रकरणी सनी गणेश खिलारे, अजय सुरेश खिलारे अमोल माने तिघे राहणार तिसंगी, (ता. कवठेमहांकाळ) व प्रवीण पूर्ण नाव माहित नाही राहणार आरेवाडी या चौघांवर कवठेमहांकाळ पोलीस ठाण्यात आज सोमवारी सकाळी दहा वाजता गुन्हा दाखल झाला आहे.