परळी शहरात बुलेट मोटारसायकलवर लावण्यात येणारे कर्णकर्कश आवाज करणारे सायलेन्सर नागरिकांच्या त्रासाचे कारण ठरत होते. रात्री उशिरापर्यंत आणि दिवसभर रस्त्यावरून जाताना या आवाजामुळे केवळ नागरिकांच्या कानांचा त्रास होत नव्हता तर विद्यार्थ्यांच्या अभ्यासात अडथळा, रुग्णांना होणारा त्रास तसेच शांतता भंग होत असल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या. या पार्श्वभूमीवर परळी पोलिसांनी अशा ध्वनिप्रदूषण करणाऱ्या बुलेट सायलेन्सरवर कठोर कारवाई केली. शह पोलिसांनी हे सायलेन्सर ताब्यात घेतले आणि रोलर फिरवला.