गुडधी येथे हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार आज सायंकाळी अकोल्यात ढगफुटी सदृश पाऊस झाला आहे. या पावसामुळे अकोला शहरातील गुडधी,उमरी परिसरात पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. वाहणाऱ्या नाल्याचे पाणी अनेकांच्या घरात घुसले आहे. त्यामुळे नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. रस्ते, घर संपूर्ण जलमय झालं आहे. घरातील महत्वाच्या वस्तू खराब झाल्या असून अन्न धान्याचे अतोनात नुकसान झालं आहे. तर जिल्ह्यातही शेतीला फटका बसला आहे. अतोनात नुकसान झाले आहे.