दोडामार्ग पोलिसांनी विजघर चेकपोस्टवर सकाळी केलेल्या कारवाईत गोवा बनावटीच्या दारूची अवैध वाहतूक करणारा एका टेम्पो पकडण्यात आला. या दारू आणि टेम्पो सह तब्बल ९ लाख ८८ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला ताब्यात घेतले असून, त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अशी माहिती बुधवार १० सप्टेंबर सायंकाळी ५ वाजता दोडामार्ग पोलीस ठाण्यातून देण्यात आली.