आरक्षणाच्या मागणीसाठी पुन्हा एकदा मराठा समाज आक्रमक झाला आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबई येथील आंदोलनाची तयारीसाठी आज मराठा समाज बांधवांची पंढरपुरात बैठक झाली. पंढरपूर आणि माळशिरस तालुक्यातून सुमारे दीड हजार गाड्या मुंबईला जाणार आहेत. तर सोलापूर जिल्ह्यातून सर्वाधिक २५ हजार गाड्या मुंबईला जाणार आहेत, अशी माहिती मराठा क्रांती ठोक मोर्चाचे राज्य समन्वयक धनाजी साखळकर यांनी आज रविवार दिनांक 24 ऑगस्ट 2025 रोजी दुपारी दोन वाजता दिली आहे.