कोरेगाव तालुक्यातील शांतीनगर येथे राहत असलेल्या, शशिकला मनोजकुमार ओसवाल यांच्या जागेवर अनधिकृतपणे अतिक्रमण करून, रस्त्याचे काम सुरू केले आहे, याबाबत संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी व मला न्याय मिळावा अन्यथा, येत्या आठ दिवसात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्यात येणार असल्याचा इशारा, ओसवाल यांनी आज मंगळवार दिनांक 9 सप्टेंबर रोजी दुपारी एक वाजता जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे, या संदर्भात अखिल भारतीय परिसंघचे विजय मोरे यांनी निवेदन दिले आहे.