पालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पवई येथे नाथपंथी डवरी गोसावी समाजाचा मेळावा पार पडला श्रीनाथ सेवक संघटनेतर्फे हा मेळावा आज मंगळवार दिनांक १२ ऑगस्ट रोजी दुपारी दोन वाजता आयोजित करण्यात आला नाथपंथी समाजासह ईतर भटके विमुक्त समाजातील लोकांनी देखील मोठ्या प्रमाणावर मेळाव्याला हजेरी लावली या मेळाव्यात आमदार अशोक पाटील, पवई पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सोनवणे, सेवानिवृत्त वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवनाथ शिंदे व अनेक मान्यवर उपस्थित होते.