अकोल्याच्या मुर्तीजापुर तालुक्यातील ग्राम खोळद येथील काल युवक शंतनू अविनाश मानकर राहणार खोळद आपली बैल जोडी घेऊन पेढी नदीवर गेले असता. वाहत्या पाण्यात वाहून गेल्याची घटना आज पहाटे उघडकिस आली आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अकोला संदीप साबळे व मूर्तिजापूरचे आमदार हरीश पिंपळे व तहसीलदार मूर्तिजापूर शिल्पा बोबडे, यांच्या सूचनेनुसार कुरणखेड येथील वंदे मातरम आपत्कालीन शोध व बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले असून बोटीच्या सहाय्याने वाहून गेलेल्या युवकाचा शोध घेणे सुरू आहे.