समोर असलेल्या ट्रकला ओव्हरटेक करणे दुचाकी चालकाला भोवले. यात विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रकला दुचाकी धडकल्याने चालकाचा जागीच मृत्यू झाला. तर त्याच्या मागे बसलेले दोघेही गंभीर जखमी झाले. ही घटना 2 सप्टेंबर रोजी सकाळी ८ वाजताच्या सुमारास पवनी मार्गावरील बोरगाव येथे घडली. कुंभराज शामराव शेंद्रे (६५, रा. गोलेवाडी ता. पवनी) असे मृताचे नाव आहे. गंभीर जखमींमध्ये हेमंत शेंद्रे व सरोज शेंद्रे यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे पुतण्याच्या डोळ्यादेखत काकाचा दुर्देवी मृत्यू झाला.