तालुक्यातील अकोली जहांगीर येथील जय किसान नवदुर्गा उत्सव मंडळाद्वारा दररोज हजारो भाविकांकरता महाप्रसाद वितरण पार पडत आहे. तर दररोज मिष्ठांनाचा महानैवैद्य अर्पित होत असून अष्टमी तिथीला भव्य महायज्ञ देखील पार पडणार आहे.अकोली जहागिरी येथील या सार्वजनिक दुर्गोत्सव मंडळात संपूर्ण गावातील भाविक भक्त सहभाग होत असून ग्रामीण भागात या नवरात्रोत्सव मंडळ द्वारा नवरात्री निमित्त अन्नदानासह विविध उपक्रम पार पडत आहेत अष्टमी व नवमी तिथिला विशेष आयोजन व अनुष्ठान पार पडणार आहेत.