लातूर : राज्यातील अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले असून शेतीचे न भरून येणारे तोटे पाहता शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर क्रांतिकारी शेतकरी संघटनेने सरकार तसेच जनप्रतिनिधींवर थेट निशाणा साधत तीव्र भूमिका मांडली आहे. संघटनेचे प्रदेश कार्याध्यक्ष सत्तार पटेल यांनी आज माध्यमांशी बोलताना स्पष्ट शब्दांत सांगितले की, “सध्या राज्यभर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतीची पाहणी सुरू आहे. पंचनामे, दौरे, भेटी चालू आहेत.