गगनबावडा तालुक्यात मुसळधार पावसाची संततधार सुरू आहे. परिणामी करूळ घाटात आज सोमवार 16 जून सकाळच्या दरम्यान दरड कोसळली आहे. रस्त्यावर मातीचे ढिगारे आले आहेत. त्यामुळे कोकणात कोल्हापूर गगनबावडा मार्गे सिंधुदुर्गला जाणारी वाहतूक व कोल्हापूरला येणारी वाहतूक ठप्प झाली आहे. अकराच्या दरम्यान मातीचे ढिगारे बाजूला काढण्याचे काम सुरू आहे.