कृष्णा नदीच्या वाढलेल्या पाणी पातळीमुळे सांगली वडी परिसरातील नदीकाठच्या शेतात दोन मोठ्या मगरी आल्याचे आढळून आले आहे. यामुळे स्थानिकांमध्ये भीतीच वातावरण निर्माण झाले. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे कृष्णा नदीतील पाण्याची पातळी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. याच कारणामुळे नदीपात्रातील मगरी आता पाण्याच्या प्रवाहाने बाहेर पडून शेतात शिरले आहेत. या अजस्त्र मगरी उसाच्या शेतात तळ ठोकून बसल्याचे शुक्रवारी २२ ऑगस्ट रोजी सायंकाळी पाच वाजता निदर्शनास आल्या आहेत. यापूर्वीही नदीतील