गंगापूर भागातील कटारिया पुलाखाली नदीपात्रात एका वृद्ध व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याची घटना घडली असून गंगापूर पोलीस ठाण्यात आकस्मत मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार किसन रखमाजी मूळ वय 65 राहणार सप्तशृंगी अपार्टमेंट, शारदा नगर,सावरकर नगर हे वाचमेन रूममध्ये राहत असून त्यांचा मृतदेह कटारिया पुलाखाली,दत्त मंदिर चौक येथे नदीपात्रात बुडालेल्या अवस्थेत आढळून आला.स्थानिक नागरिकांनी गंगापूर पोलिसांना संपर्क केला मृतदेह बाहेर काढण्यात आला.