कोठारी-बल्लारपूर राष्ट्रीय महामार्गावर येनबोडी येथील रस्त्याच्या कडेला असलेल्या हेमंत फुलझेले यांच्या घरात सुरजागड लोहखनिज वाहतूक करणारा मालवाहू ट्रक घुसला. अपघातात घराच्या भिंतीसह दुचाकीचे मोठे नुकसान झाले.सुरजागड येथुन लोहखनिज भरलेला ट्रक क्र. एम एच ३३ टि ४०९५ बल्लारपूरकडे जात होता. रात्रीची वेळ असल्याने चालक ट्रक भरधाव वेगाने चालवीत होता. अशात चालकाचे वाहनवरील नियंत्रण सुटले व येनबोडी येथील रस्त्याच्या कडेला असलेल्या हेमंत फुलझेले यांच्या घरात घुसला.