जिल्हा सर्वाधिक सोयाबीन पिकाचे नुकसान. वाशिम जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे 4 लाख 11 हजार एकर क्षेत्रावरील पिकांचं नुकसान झालं असून यामध्ये सर्वाधिक 2 लाख 80 हजार एक्कर वरील सोयाबीन पिकाचं नुकसान झालंय. त्यामुळे यंदा सोयाबीनच्या उत्पादनात जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात घट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आधीच सोयाबीनला योग्य दर नसल्याने शेतकरी अडचणीत होते आता उत्पादनातही घट होणार असल्याने दुहेरी संकट शेतकऱ्यांवर ओढावणार आहे.