आज ३ सप्टेंबर बुधवार रोजी सायंकाळी साडेसहा वाजता मिळालेल्या माहितीनुसार अमरावती शहरातील प्रसिद्ध बांबू गार्डनमध्ये एका माकडाच्या पिल्लाचे बांबूच्या झाडीत अडकलेले प्रकरण समोर आले. स्थानिक नागरिकांनी ही घटना लक्षात घेऊन तात्काळ अमरावती महानगरपालिका उद्यान विभागाशी संपर्क साधला.मिळालेल्या माहितीनुसार, पिल्लू बांबूच्या दाट फांद्यांमध्ये अडकून सुटण्याचा प्रयत्न करत होते. उद्यान विभागाच्या कर्मचाऱ्यांनी तत्परतेने घटनास्थळी धाव घेतली आणि सुरक्षित पद्धतीने पिल्लाला बाहेर काढले..