चोपडा तालुक्यात अकुलखेडा हे गाव आहे. या गावातील रहिवाशी नेहा विजय धनगर वय १८ या तरुणीने आपल्या राहत्या घरात गळफास घेतला. हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर तिला उपजिल्हा रुग्णालय चोपडा येथे नेण्यात आले. तेथे डॉक्टरांनी तपासणी करून तिला मयत घोषित केले. तेव्हा या प्रकरणी चोपडा शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.