परळी तालुक्यात अवैध वाहतुकीवर अंकुश ठेवण्यासाठी पोलीस प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे. परळी ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीत धर्मापुरी परिसरात धडक तपासणी मोहिम राबविण्यात आली. या दरम्यान संशयित कारची झडती घेतली असता त्यातून तब्बल ₹३ लाख ५३ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई स्वतः डीवायएसपी आयपीएस ऋषिकेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. परळी तालुक्यातील ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर अवैध धंदे व वाहतूक सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली.