जिल्ह्यात 29 ऑगस्ट रोजी सकाळी आठ वाजता संपलेल्या चोवीस तासांत सरासरी 91.8 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. यामध्ये चाकूर तालुक्यात सर्वाधिक 152.4 मिलीमीटर, तर औसा तालुक्यात सर्वात कमी 32 मिलीमीटर पाऊस झाला आहे. अशी माहिती आज दुपारी 12 वाजून 26 मिनिटाला जिल्हा माहिती कार्यालयाकडून देण्यात आली.