राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या एफ.आर.पी. बाबत बेकायदेशीर निर्णय घेतल्याचा आरोप करत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी आज शुक्रवार दिनांक 12 सप्टेंबर रोजी सकाळी आठ वाजता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर घणाघाती टीका केली आहे.७० हजार कोटींचा सिंचन घोटाळा पचवणाऱ्या अजित पवारांना शेतकऱ्यांचा एफ.आर.पी. पचू देणार नाही, असे म्हणत त्यांनी सरकार आणि साखर कारखानदारांवर रोष व्यक्त केला. काही मुठभर कारखानदारांच्या फायद्यासाठी ऊस उत्पादकांची फसवणूक सुरू आहे.