परळी तालुक्यात मंत्री पंकजा मुंडे यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आलेल्या जनता दरबाराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या दरम्यान अनेकांनी आपल्या अडीअडचणी, समस्या आणि तक्रारी मंत्री मुंडे यांच्यासमोर मांडल्या. रोजगार, पाणीपुरवठा, वीज, रस्ते, शासकीय योजनांचा लाभ तसेच इतर स्थानिक प्रश्न या जनतेने थेट मंत्री मुंडे यांच्यापर्यंत पोहोचवले. जनता दरबारात आलेल्या प्रत्येक नागरिकाची समस्या संयमाने ऐकून घेत पंकजा मुंडे यांनी तातडीने संबंधित अधिकाऱ्यांना सूचना केल्या.