चंद्रपूर शहरातील जटपुरा गेट परिसरात आज दि 11 सप्टेंबर ला 8 वाजतच्या सुमारास इमारतीचा भाग अचानक कोसळला. या घटनेत दूध विक्रेता मनिषा लोखंडे (50) हि महिला गंभीर जखमी झाली. जटपूरा गेट समोरील इमारत विनोद मेहता यांच्या मालकी आहे. हि इमारत 50 ते 70 वर्षे जुनी आहे.सदर इमारत जुन्या आणि जर्जर अवस्थेत आहे.महानगरपालिकेने तातडीने अशा जुन्या इमारतींचे सर्वेक्षण करून सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक ती कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.