वणा नदीपात्रातून अवैधरित्या रेतीचे उत्खनन करून वाहतूक करणाऱ्या दोन आरोपींवर सिंदी पोलिसांनी गुन्हा दाखल करून मोठी कारवाई केली. या कारवाईत ६ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आकाश राधेश्याम गवळी (३२, रा. सिंदी रेल्वे) व उमेश नारायण निमसडे (५३, रा. भोसा, ता. समुद्रपूर) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. ही कारवाई मंगळवारी (दि. ९ सप्टेंबरला) रात्री ९ वाजता हमदापुर-कांढळी रोडवर नाकाबंदी दरम्यान पोलिसांनी केली. अशी माहिती ता. १० सप्टेंबरला सिंदी पोलिसांनी दिली.