१ ऑगस्ट रोजी सायंकाळी ७:४५ च्या सुमारास एका नागरिकास एक समुद्रसर्प वाळूवर पडलेला आढळला, त्यांनी त्वरित वाइल्डलाइफ वॉरियर्स ऑफ अलिबाग संघटनेचे सक्रिय सभासद श्री अक्षय पाटील ह्यांना संपर्क केला, घटनेची माहिती मिळताच संस्थेचे अध्यक्ष डॉ प्रसाद दाभोळकर आणि सक्रीय सदस्य अदिती सगर हे त्वरित घटनास्थळी पोहोचले, सापाची प्राथमिक तपासणी करून तो आजारी अथवा जखमी नसल्याची खात्री करून सदर सापाला सुरक्षितपणे पुन्हा समुद्रात सोडून दिले.