बीडमध्ये तीन दिवस उलटूनही सरकारी वकिलाच्या आत्महत्येप्रकरणी कोणताही गुन्हा दाखल न झाल्याने वकिलांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण आहे. वडवणी येथील सरकारी वकील यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या त्रासाला कंटाळून गळफास लावून आत्महत्या केली होती. मात्र या घटनेला तीन दिवस होत आले तरीही पोलिसांकडून अजूनही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. आज शुक्रवारी बीड जिल्हा वकील संघाच्या शिष्टमंडळाने माध्यमांसमोर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली. आत्महत्येच्या घटनेनंतर एक चिठ्ठी सापडली असल्याची माहिती समोर आली होती.