शेगाव शहरातील सम्राट अशोकनगर येथे शहर पोलिसांनी जुगार अड्ड्यावर २९ ऑगस्ट रोजी दुपारी दोन वाजे दरम्यान छापा टाकून सात जुगाऱ्यांना रंगेहात पकडण्यात आले पोलिस हेड कॉन्स्टेबल गणेश वाकेकर यांनी पथकासह सम्राट अशोकनगर परिसरात जुगार अड्ड्यावर छापा टाकून देवराव सदाशिव, अजाबराव करनानी बाभूलकर, प्रताप कमराभाई मुलादिया, संजय भोजणे, गजानन बिसनसिंग चव्हाण, राहुल शालिक पवार, ज्ञानेश्वर गणेश मेहेंगे यांना पकडले.