बुलढाणा विधानसभा मतदारसंघातील मोताळा येथे 28 ऑगस्ट रोजी दुपारी 2 वाजता संतश्रेष्ठ श्री गजानन महाराज यांच्या 115 व्या पुण्यतिथीनिमित्त ऋषिपंचमीच्या पावन दिवशी भव्य धार्मिक व सामाजिक सोहळा पार पडला. या सोहळ्यात आमदार संजय गायकवाड यांच्या हस्ते गजानन महाराजांची महाआरती तसेच 25 लक्ष रुपये किमतीच्या नव्याने उभारण्यात आलेल्या भक्तनिवासाचे लोकार्पण करण्यात आले.