खानापूर वेस परिसरात दरवर्षी प्रमाणे यावर्षी देखील शनिवारी संध्याकाळी तान्हा पोळ्याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी तान्हा पोळ्याचा उत्साह बालगोपालांमध्ये मोठ्या प्रमाणावर दिसून आला. तर परिसरात तान्हा पोळ्यासाठी आकर्षक तोरण पताका यांनी परिसर सजावट करण्यात आली होती तान्ह्या पोळ्यात बालगोपालांनी लहान बैल हे सजवुन आणले होते तर ढोल ताशाच्या निनादात या तान्हापोळ्यामध्ये बालगोपालांनी उत्साह आनंदात सहभाग घेतला होता यावेळी पालकांनी देखील मोठ्या प्रमाणावर या तान्ह्या पोळ्यात गर्दी केली होती.