पाचोरा येथील भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून अमोल शिंदे यांच्या संकल्पनेतून दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील श्री गणेशाचे विविध रूपांत दर्शन हे नागरिकांना आशीर्वाद हॉल भडगाव रोड पाचोरा येथे होत. दरवर्षी अनोख्या पद्धतीने स्थानिक व बाहेरील नामांकित कलाकारांच्या कल्पकतेतून श्री गणेशाची विविध रूपातील कलाकृतीजी मुंबई, पुणे, नाशिक यांसारख्या मोठ्या शहरात बघावयास मिळतात त्या कलाकृती पाचोरा व भडगाव तालुक्यासह परिसरातील नागरिकांना बघावयाची संधी अमोल शिंदे यांचे संकल्पनेतून मिळत असते.