पैगंबर मोहम्मद यांच्या जयंतीचे औचित्य साधून युथ मोमेंट महाराष्ट्र युनिट उमरखेडच्या वतीने उमरखेड शहरातील हजरत तातर शहा बाबा दर्गा मैदानात 31 ऑगस्ट रोजी महा रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सदर रक्तदान शिबिरामध्ये उमरखेड वासीयांनी मोठ्या संख्येने सहभाग घ्यावा असे आवाहन उपविभागीय पोलीस अधिकारी हनुमंत गायकवाड यांनी दिनांक 30 ऑगस्ट रोजी च्या अंदाजे सायंकाळी 7 वाजताच्या सुमारास केले आहे.