दर्यापूर तालुक्यातील रामतीर्थ गावाजवळ एका युवकाच्या दुचाकीला बोलेरो वाहनाने आज दुपारी ३:४५ मिनिटांनी जोरदार धडक दिली यामध्ये युवकाचा जागीच मृत्यू झाला. अमन राजेन्द्र सावरकर वय १९ वर्ष रा. साईनगर दर्यापूर असे मृतक युवकाचे नाव आहे. मृतक युवक हा अकोला येथे नीट परीक्षेचा कोर्स करीत आहे सुट्टी असल्याने तो आज त्याच्या दुचाकीने अकोला येथून दर्यापूर येथे घरी जात असताना अज्ञात बोलेरो वाहनाने त्याच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.