मालेगाव बाजार समितीत चिखलाचे साम्राज्य,शेतकरी त्रस्त अँकर- नाशिकच्या मालेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत रोज मोठ्या प्रमाणावर तालुक्यासह अन्य भागातून शेतकरी व खरेदीदार खरेदी विक्री साठी येत असतात, सतत धार येणाऱ्या पावसामुळे आज दिनांक 7 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 6 वाजेच्या दरम्यान संपूर्ण भाजी बाजार आवारात चिखलाचे साम्राज्य पसरलेले असल्याने अनेक जण भाजी घेऊन जाताना घसरून पडत आहे तर भाजी पाल्याच्या छोट्या गाड्या चिखलात रुतून पडत असल्याने त्यांना धक्के मारून बाहेर काढावे लागत आहे.