अकोट तालुक्याच्या जवळील वान धरणामध्ये मुसळधार पावसामुळे 81 टक्के जलसाठा झाल्या असल्याची माहिती पाटबंधारे विभागा द्वारा प्राप्त झाली आहे.तर सातपुडा डोंगर रांगांमध्ये असणाऱ्या वाण धरण पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणावरती मुसळधार पाऊस होत असल्याने वाण धरणातील पाण्याच्या आवक मध्ये मोठी वाढ होत असून ऑगस्ट अखेरपर्यंतच वान धरणातील पाणीसाठा 81 टक्के पर्यंत पोहोचला असल्याने पुढील सप्टेंबर महिन्यापर्यंत वान धरण 100% भरण्याचा अंदाज व्यक्त होत आहे.